ताज्या बातम्या

अर्धापूर येथील 14 वर्षीय रेवाने अमेरिकेत उडविले विमान

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर  तालुक्यातील कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी (स्ट्रिंग कंट्रोलेड) दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा परिणाम त्यांची मुलगी कु. रेवा दिलीप – जोगदंड यांच्या बालमनावर झाला. तेव्हा पासून तिने भविष्यात पायलट  होण्याचे स्वप्न उराशी बाळगून  पुढील वाटचाल सुरू केली. आणि एक हे स्वप्न सत्यात उतरले. कु.रेवा दिलीप जोगदंड (वय १४ वर्षे ) यांनी दि. २० जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली आहे.
         तिच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला. अधार्पूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याच बरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ७ नवनवीन प्रयोग केले जातात. तर र येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन न वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील न शेतकऱ्यांनी आपल्या बहिणीला  दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी न तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टर मधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. आता १४ वर्षीय  रेवाने विमानाने आकाशास गवसणी  घातल्याने कोंडा गाव पुन्हा चर्चेत  आले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *