ताज्या बातम्या

3 महिलांसह 29 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या

कबाडे यांचे खास श्रीमंगले भोकरला
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर सुरूवातीला आहे त्या ठिकाणी आणि कांही जणांना नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली होती. 22 जून रोजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी निर्गमित केलेल्या नुतन आदेशानुसार एकूण 29 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यात तीन महिला आहेत. अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे खास पोलीस उपनिरिक्षक भोकर वाचक शाखेत नियुक्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार 29 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.  ते पुढील प्रमाणे आहेत बाबू तुकाराम केंद्रे(पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण), उत्तम शंकरराव वरपडे (वजिराबाद),सुधाकर सटवाजी मुसळे (शहर वाहतूक शाखा वजिराबाद), अ. लतीफ अ. रहीम शेख (रामतीर्थ), माधव मष्णाजी वाडेकर(धर्माबाद),
संजय उमाकांतराव अटकोरे(कुंटूर),  सुभाष दत्तरामजी धात्रक(नियंत्रण कक्ष),अविनाश गोविंदराव सातपुते(जिल्हा विशेष शाखा), माणिक देवराव हंबर्डे (नांदेड ग्रामीण),  मधुकर पंढरीनाथ जायभाये(मरखेल),दिपक रामचंद्र भोपळे(सिंदखेड),अर्जुनसिंह गणेशसिंह ठाकुर (शहर वाहतूक शाखा इतवारा),  भारत पंडीतराव सावंत (इस्लापूर),  रामदास संभाजीराव श्रीमंगले(वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर ), महेश हनमंतराव कुलकर्णी(नियंत्रण कक्ष),विनायक नागोराव केंद्रे (इतवारा),उत्तम दगडुजी बुक्तरे(नांदेड ग्रामीण), नागोराव बालाजी कुंडगीर (पोलीस नियंत्रण कक्ष), अरुण सूर्यकांत मुखेडकर(कंधार),  हरजिंदरसिंग बलवंतसिंग चावला (दहशतवाद विरोधी कक्ष),जमीलोद्दीन मोईनोद्दीन जहागीरदार,सतीष विठ्ठलराव झाडे, किशन शामा आडे, बाबु मैसाजी शिंदे,अनिसा फातिमा खदीर अली सय्यद (नियंत्रण कक्ष),बालाजी देविदास पवार(मुदखेड), रुपाली गौतम कांबळे(बिलोली), गंगाप्रसाद बाबुराव दळवी(सायबर कक्ष),स्मिता दिलीपराव जाधव(किनवट).
भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे पोलीस अंमलदार असतांना अत्यंत खास असलेले आणि आता पोलीस उपनिरिक्षक झालेले रामदास श्रीमंगले यांना पोलीस उपअधिक्षक कार्यालय भोकर येथे वाचक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. उपअधिक्षक कार्यालयात असले तरी ते अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे  यांच्या जवळच आहेत असे म्हटले तर चुक ठरणार नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *