नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर शहरातील फुलेनगर भागात वीज थकबाकी वसुल करण्यासाठी गेलेल्या उपकार्यकारी अभियंता आणि त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत एका ग्राहकाने धक्काबुक्की आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दि.21 जून रोजी अर्धापूर येथील थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांकडून वसुली करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता सय्यद सादतउल्ला महेबुब कादरी व त्यांचे अनेक सहकारी फिरत असतांना ते फुलेनगर भागात गेले. त्या ठिकाणी बाळासाहेब बाबासाहेब देशमुख हे थकबाकीदार आहेत. त्याबद्दल बोलत असतांना त्यांचा मुलगा किशोर देशमुख याने उपकार्यकारी अभियंता कादरी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत किशोर देशमुखने शिवीगाळ केली सोबतच ऍट्रॉसिटी व विनयभंगासारख्या गुन्ह्यात तुम्हाला अडकवेल अशी धमकी दिली. घडलेल्या प्रकराबद्दल विज वितरण कंपनीने दिलेल्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीस ठाण्यात किशोर देशमुखविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या 353 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
