नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत निवडणुकीच्या कारणावरून मौजे वजिरगाव ता.नायगाव येथे 11 जणांनी मिळून एका 36 वर्षीय युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
मारोती शंकर ढगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.21 जून रोजी सकाळी 7.30 वाजता वजिर गावातील शिवाजी जकोजी ढगे (55), दादाराव जकोजी ढगे (57), विश्र्वंभर शेषराव ढगे (50), चक्रधर विश्र्वंभर ढगे (23), मारोती दिगंबर ढगे (26), अविनाश शिवाजी ढगे (22), शहाजी सुधाकर ढगे (25), हनुमंत दादाराव ढगे (31), आनंदा शेषराव (48), शंकर दिगंबर ढगे(30), बालाजी आनंदा ढगे (32) या सर्वांनी मिळून मारोती ढगेला मागील ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून कुऱ्हाडीने डोक्यात मारले. लोखंडी सळाईने मानेवर, पाठीवर गंभीर जखमा केल्या. कुंटूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 143, 147, 148, 149, 504 नुसार गुन्हा क्रमांक 124/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक यादव जांभळीकर हे करीत आहेत.
