ताज्या बातम्या

मला पोलीसांनी गुन्हेगार बनवले; थेट मुलाखतीत रिंदा सांगत होता

माझ्या नावावर खंडणी घेणारा पोलीस अधिकारी सध्या तुरूंगात इति रिंदा उवाच
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये कांही पोलीसांनी माझ्या नावावर खंडणी वसुल केल्याचा प्रकार घडला. त्यातील एक पोलीस निरिक्षक मकोका कायद्याअंतर्गत सध्या तुरूंगात आहे. मी सत्यासाठी लढल्यामुळे मला पोलीसांनी गुन्हेगार बनवले अशी खळबळजनक मुलाखात नांदेडसह पंजाब राज्यात अनेक गुन्ह्यांसाठी हवा असलेला आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू याने आज प्रो पंजाब नावाच्या एका चॅनलला लाईव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीचे प्रेक्षक 10 हजारापेक्षा किती तरी जास्त होते.
आज सकाळी प्रो पंजाब नावाच्या एका चॅनलवर हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू  याची थेट मुलाखत सुरू झाली. प्रश्न विचारणारा पत्रकार रिंदाला तु गॅगस्टर आहेस, अनेक प्रतिबंधीत संघटनाचा सदस्य आहेस असा आरोप पोलीस करतात अशी सुरूवात केली. सोबतच तु अनेकांकडून खंडणी वसुल केली त्यामुळे तु आता गॅंगस्टर झाला आहेस असा प्रश्नांचा आशय होता. यावर रिंदाने सुरूवात सन 2008 पासून केली.ज्यामध्ये बिदर(कर्नाटक) पोलीसांनी नांदेड येथील काही युवकांवर केलेला अन्याय सांगितला. त्यामुळे माझ्या मनात खऱ्यासाठी लढण्याची मानसिकता तयार झाली आणि मी तशी सुरूवात केली. त्यानंतर मी पंजाबमध्ये आलो. येथील राजकारणाचा बळी ठरलो आणि तुरूंगात गेलो. सात वर्ष तुरूंगात असतांना तुरूंगात मादक पदार्थ पुरवठा करणाऱ्यांविरुध्द तुरूंगातून लढा दिला. पण त्यात मला यश आले नाही. तुम्ही सांगत असलेल्या प्रतिबंधीत संघटनेचा सदस्य आहे काय? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, तुम्हाला माझ्याबद्दल काय म्हणायचे आहे ते म्हणा पण मी एक ध्येय घेवून लढलो. सोबतच मला पोलीसांनी गुन्हेगार बनवले याचे उदाहरण सांगतांना रिंदा सांगत होता की, मी एक खून केला. मरणारा व्यक्ती कोण्या तरी मोठ्या व्यक्तीचा नातलग होता. मी माझी बाजू पोलीसंासमक्ष सांगून हजर झालो होतो. पण पोलीसांनी माझ्यासोबत केलेला अन्याय त्याने वर्णन केला तेंव्हा एका महिला अधिकाऱ्यासमक्ष मला हजर केले होते तेव्हा तिला माझ्या शरीरावरील जखमा पाहता आल्या नाहीत असे सांगितले.
नांदेडमध्ये मी एक खून केला. हे त्याने आपल्या मुलाखतीत मान्य केले. माझ्या बंधूच्या खूनामधील आरोपी माझ्या भाऊ आणि वडिलांविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. असाही उल्लेख केला. नांदेडमध्ये रिंदाचा बंधू सत्याचा खून झाला होता. त्याप्रकरणातील आरोपींपैकी फक्त एकाला शिक्षा झाली इतरांची पुराव्या अभावी सुटका झाली आहे.नांदेडमध्ये अशी ख्याती आहे की, रिंदाने दोन खून केले. पण त्याने आपल्या मुलाखतीत एकच मान्य केला. ही मुलाखत सुरू असतांना असंख्य लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया सुध्दा देत होते. युटयुबच्या (
https://fb.watch/v/1bp16XxLo/) या लिंकवर थेट मुलाखात प्रसिध्द झाली होती.
मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने रिंदाला तु अनेकांकडून खंडण्या वसुल केल्याचा प्रश्न विचारला तेंव्हा अत्यंत बेधडकपणे रिंदा सांगत होता मी दोन नंबरच्या लोकांकडून खंडण्या घेतल्या आहेत. सोबतच रिंदाने सांगितलेल्या माहितीनुसार नांदेडमध्ये कांही पोलीसच माझ्या नावाने खंडण्या वसुल करत होते. त्यातील एक पोलीस निरिक्षक मकोका कायद्याअंतर्गत सध्या तुरूंगात असल्याचे आपल्या मुलाखतीत सांगितले. पत्रकाराने तु पोलीसांसमक्ष शरणागती पत्कारणार आहेस की, नाही असा प्रश्न विचारला तेंव्हा रिंदा म्हणाला मला पोलीसांवर विश्र्वास नाही. मी घेतलेल्या अनुभवाप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्यासमक्ष मी सर्व हकीकत सांगून, आपला गुन्हा कबुल करून हजर झालो होतो पण नंतर तो पोलीस अधिकारी बदलला आणि माझ्यावर अन्याय झाला. या थेट मुलाखतीच्या प्रेक्षकांचा आकडा या मुलाखतीच्या प्रसिध्दीची माहिती देतो.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *