

नांदेड (प्रतिनिधी)- बदलत्या हवामानाचा हवामानाचा विचार करता शेतकर्यांनी पीकपेरणी पध्दतीत बदल करून बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यास ती शेतकर्यांसाठी लाभदायक ठरते असे प्रतिपादन राज्याचे कृषी संचालक नारायण शिसोदे यांनी कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत सोयाबीन बियाणे व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक प्रसंगी मालेगाव येथे कृषिभूषण शेतकरी भगवान इंगोले यांच्या शेतावर आयोजित कार्यक्रमात केले .
पारंपारिक पध्दतीने पेरणी केल्यास शेतकर्यांना बियाणे खते जास्त लागतात परिणामी खर्च वाढतो त्याचबरोबर शेतात जास्त पाऊस झाला तर निचरा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.पारंपरिक पीक पेरणी पद्धतीत बदल करून बीबीए यंत्राद्वारे पेरणी केल्यास बियाणे व खत कमी लागते तसेच कमी जास्त पाऊस झाला तरी पिके तग धरतात पेरणीच्या तासात अंतर राहिल्याने हवा खेळती राहते व उत्पादनात वाढ होते त्यामुळे शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी अशी अपेक्षा राज्याचे कृषी संचालक (मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन)श्री शिसोदे यांनी व्यक्त करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळालेल्या अवजारे बँकेचा शेतकर्यांना होणारा प्रत्यक्ष लाभ लाभ पाहून समाधान व्यक्त केले या वेळी जिल्हा कृषी अधीकारी रविशंकर चलवदे ,उपविभागीय कृषी अधीक्षक रविकुमार सुखदेव , तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल,प्रगतशील शेतकरी गणपत इंगोले, बेगाची चंदेवार, प्रभाकर इंगोले ,संगम देलमडे, संजय खराटे कृषिसहायक लिंगापुरे उपस्थित होते .
इंगोले यांनी व्हर्मीकंपोस्ट व नाडेप कम्पोस्ट बाबत पुढाकार घ्यावा
कृषिभूषण भगवान इंगोले यांनी सेंद्रिय शेतीचे उभे केलेले मॉडेल हे आयडियल असून त्यांनी व्हर्मी कंपोस्ट व नाडेप कंपोस्ट युनिटची उभारणी करून त्यांचे इतर शेतकर्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देण्याचे काम करावे अशी अपेक्षा कृषी संचालक नारायण शिसोदे यांनी व्यक्त केली.