नांदेड(प्रतिनिधी)-हिप्परगा येथून बदली झालेले पोलीस उपनिरिक्षक जायभाये यांचा सन्मान करून गावकऱ्यांनी त्यांना निरोप दिला.
कंधार तालुक्यातील हिप्परगा शाह येथे गावातील सरपंच पवन अंगद कदम आणि इतर गावकऱ्यांनी पोलीस उपनिरिक्षक मधुकर पंढरीनाथ जायभाये यांचा बदली झाल्यानंतर सन्मान करून त्यांना निरोप दिला. मुखेड येथे आपला कार्यकाळ पूर्ण करून त्यांची बदली मरखेल ठिकाणी झाली आहे. आपल्या कामाची पावती म्हणजे आपला सत्कार असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपनिरिक्षक मधुकर जायभाये यांनी दिली.
