नांदेड (प्रतिनिधी)- राजकारणातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गाचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी त्याचा निर्णय होईपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये अशा आशयाचे निवेदन नांदेडपंचायतसमितीचे सभापती बबन वाघमारे यांच्यासह अनेकांनी आजदिले.
ओबीसी आरक्षणाबद्दल सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे काही दिवसांत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा कालच नांदेडमध्ये केली. आज सभापती बबन वाघमारे यांच्यासह अनेकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसील कार्यालयामार्फत एक निवेदन पाठविले. ज्यामध्ये ओबीसी आरक्षण ठेवण्यासाठी मागासवर्गीय कर्मचारी यांचे आरक्षण पदोन्नतीमध्ये कायम करावे. ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी.
अशा आशयाचे निवेदन सभापती बबनराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मुगलाजी काकडे यांना देण्यात आले. याप्रसंगी इंजि. बालाजी काळे, भारत काकडे, ऍड. माणिक वाखरडे, गोविंद गोरे, शिवाजी गोरे, नवनाथ काकडे, बालाजी पाटील नारे, बालाजी काकडे, शिवाजी होळकर, गजाननसरोदे, कृष्णा बारसे, अनिल पगडे, ज्ञानदीप साखरे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
