नांदेड(प्रतिनिधी)-पालकमंत्र्या
नांदेड शहरात आणि जिल्ह्याच्या मटक्यांच्या बुक्या अत्यंत जोरदारपणे सुरू आहेत. याबद्दल अनेकांनी आवाज उठवला. विशेष करून कॉंगे्रस पक्षाच्या नगरसेवकांनी सुध्दा शहरातील आणि जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले. या निवेदनानंतर पोलीसांनी कॉंगे्रसचे समर्थक असलेले मटका बुक्की सोडून इतरांवर काही गुन्हे दाखल केले. पण त्यामुळे कॉंगे्रस मंडळी चालवतात त्या मटका बुक्की सुरूच राहिल्या. असाच प्रकार नेहमीच घडत आहे.
शिवाजीनगर भागातील जनता मार्केटकडून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या शेवटी समोर पालकमंत्र्यांच्या घरात जाण्यासाठी एका रस्ता केला आहे. पण कांही कारणांमुळे तो रस्ता अजून तयार झाला नाही. तेथे एक लोखंडी गेट लावलेले आहे. पालकमंत्र्यांच्या घराकडे जाण्यासाठी त्या गेटसमोरून डावीकडे वळण घ्यावे लागते. त्या गेटसमोरील उजव्या वळणावर फुलेनगर सुरू होते. या फुलेनगर वसाहतीला सुध्दा दोन ठिकाणी लोखंडी गेट लावलेले आहेत. या लोखंडी गेटच्या समोरच राजरोसपणे मटक्याच्या दोन बुक्की सुरू असल्याचे चित्र प्राप्त झाले. या चित्रामध्ये मटक्याचे आकडे लिहिणाऱ्यासमोर दोन बुक दिसतात. एकावर तो लिहित आहे. तसेच त्याच्या शेजारी एक कॅलकुलेटर आहे. मग पालकमंत्र्यांच्या घरी जातांना सुध्दा मटकाबुक्कीजने आपले बस्तान बसवलेलेच आहे तर शहरातील इतर ठिकाणी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मटकाबुक्कीबद्दल काय लिहावे. लोकशाहीतील सर्वात सामान्य माणुस असलेल्या व्यक्तीसाठी मटका हा खेळ अत्यंत प्रभावी मानला गेला. म्हणूनच बहुदा या मटका बुक्कीकडे पोलीसांनी संवैधानिक दृष्टीकोणातून पाहिले नसेल असे म्हटले तर चुक ठरणार नाही.
