ताज्या बातम्या

29 मार्चच्या पोलीस हल्ला प्रकरणात एकाला तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-23 मार्चच्या पोलीसांवरील हल्ला प्रकरणात एका 21 वर्षीय युवकाला अटक झाल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांनी त्या युवकाला तीन दिवस अर्थात 26 जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
29 मार्च 2021 रोजी पोलीसांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण भरपूर गाजले. अनेक लोकांची नावे बळजबरीने त्या गुन्ह्यात गोवली गेली. हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला. त्यामुळे या प्रकरणासाठी विशेष समितीचे गठण करण्यात आले. या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार वजिराबादचे पोलीस निरिक्षक असले तरी निर्णय त्यांच्या हातात नव्हता. याचा एक प्रत्यय 25 मे रोजी समोर आला आणि केल कोणी आणि भराव लागला कोणाला असा प्रकार घडला. आजही त्या प्रकरणातील वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सोमनाथ शिंदे हे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी परभणीच्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहे. सोमनाथ शिंदे यांनी आपल्या फेसबुकपेजवर लिहिलेल्या एका लिखाणानुसार त्यांच्यावर झालेला अनन्वित अन्याय दुर करावा अशी मागणी त्यात होती. पण काय झाले त्या लिखाणानंतर याचा काही थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. त्यांच्यासोबत वजिराबादचे पोलीस अंमलदार संजय जाधव सुध्दा कठड्यावर आहेत. कोणीकडे त्यांचा तोल ढकलला जाईल याची आज शाश्वती नाही. ज्या दिवशी त्यांचा तोल सकरात्मक किंवा नकारात्मक बाजूला ढकलला जाईल त्यावेळेस पोलीस दलातील बरेच अधिकारी आणि अंमलदार आपले आत्मपरिक्षण नक्कीच करतील. गुन्हा क्रमांक 114 मध्ये आजपर्यंत 27 जणांना अटक झाली आहे.
29 मार्चच्या गुन्हा क्रमांक 114 आणि 115/2021 मध्ये आता जवळपास तीन महिने पुर्ण होत आले आहेत. वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार शेख इमरान, संतोष बेल्लूरोड आणि चंद्रकांत बिरादार यांनी पलविंदरसिंघ प्रीतमसिंघ शाह (21) रा.शहीदपुरा यास पकडले. आज 22 जून रोजी पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पलविंदरसिंघ शाहला गुन्हा क्रमांक 115/2021 मध्ये न्यायालयात हजर केले. सरकारील वकील ऍड. सुनंदा चावरे यांनी पलविंदरसिंघ शाह हा 29 मार्च रोजी तेथे असलेल्या पोलीसांच्या गाड्या फोडतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो आहे म्हणून त्याच्यावरील हा आरोप सविस्तरपणे पोलीसांना मांडता यावा यासाठी पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता न्यायालयासमक्ष मांडली. युक्तीवाद ऐकून मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांनी पलविंदरसिंघला तीन दिवस अर्थात 26 जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. गुन्हा क्रमांक 115 मध्ये अटक होणारा पलविंदरसिंघ हा दुसरा व्यक्ती आहे. यापुर्वी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक झालेली आहे.
29 मार्चचे हे प्रकरण आता वेगवेगळ्या चर्चांमुळे समोर आले आहे.त्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ज्यांनी भारतीय संविधानाला योग्यरितीने अंमलात आणण्याची शपथ घेतली आहे. त्यांनी त्याकडून पाठ फिरवून आपल्या भाकरीवर जास्तीत जास्त तुप ओढण्याची घाई केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगवेळेच वळण लागत आहे. ज्या गुन्हेगारांनी खऱ्या अर्थाने हल्ला केला. पोलीसांच्या गाड्या फोडल्या त्यांना जेरबंद करून पोलीसांनी आपला दम दाखवण्याची आजची गरज आहे. पण घडणाऱ्या घटनांना अयोग्यरितीने हाताळल्यामुळे आणि कांही करवल्यांच्या सांगण्यातून आपला मार्ग ठरविल्याने त्या प्रकरणात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *