ताज्या बातम्या

वांग्याच्या शेतात गांजाची लागवड 

तीन लाखाची गांज्याची झाडे जप्त : स्थागुशाची कारवाई 

नायगाव (प्रभाकर लखपत्रेवार)-राहेर येथील शेतकऱ्यांने हरनाळा शिवारातील वांग्याच्या शेतीत गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाल्याने. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने मंगळवारी कारवाई करत गांज्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेत ६२ किलो वजनाच्या ३ लाखाच्या गांज्याची झाडे जप्त केली आहेत. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती पोलीस उप निरिक्षक सचिन सोनवणे यांनी दिली आहे. 

       नायगाव तालुक्यातील राहेर येथील शेतकरी बळीराम गंगाराम  घोरपडे यांचे बिलोली तालुक्यातील हरनाळा येथे शेती आहे. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरनाळा परिसरात असलेल्या गट नंबर ३६ मधील शेतात वांग्याचे पिक घेतले पण या वांग्याच्या पिकात गांज्याच्या झाडाची लागवड केली. सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाने (ता.२२) रोजी सकाळी हरनाळा शिवारातील शेतात धाड मारली. यावेळी वांग्याच्या पिकात कुठलीही परवानगी न घेता गांज्याची ३८ झाडे लावल्याचे दिसून आले.
       यावेळी गांज्याच्या झाडांची लागवड करणारे बळीराम घोरपडे यांना अगोदर ताब्यात घेतले व बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन ३ लाख ९ हजार ६५० रुपये किमतीची ६२ किलो वजनाची ३८ गांज्याची झाडे जप्त करण्यात आली. घोरपडे हा गांजाची नशा करणारा शेतकरी असून तो शेतातच गांजाचे उत्पादन घेतो आणि ही बाब कुंटूर पोलीसासह परिसरातील अनेकांना माहीत आहे पण आजपर्यंत कुणीही कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली.
     सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेका जमादार दशरथ जाभळीकर, गुंडेराव  करले, मारोती तेंलग, रणधीर राजवंशी, मोतीराम पवार, विठ्ठल शेळके, देविदास चव्हाण,हनुमानसिंह ठाकूर आणि कुंटूर पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस अंमलदार दिंचा सहभाग असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक सोनवणे यांनी दिली आहे.गांजाची लागवड पकडणाऱ्या पोलीस पथकास पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,बिलोलीचे पोलीस उप अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर धुमाळ आदींनी कौतुक केले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.