रात्रीच्यावेळी बेकायदेशीर वाळूची वाहतुक अव्याहत सुुरुच
नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.21 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या समक्ष गोदावरी नदीपात्रातून अवैध रित्या वाळचे उत्खनन करणारे 64 तराफे जाळण्यात आले. फक्त तराफे जाळण्याने अवैध वाळतू उत्खनन त्या एका दिवसापुर्तेच थांबते. कालच्या तराफे जाळण्याच्या वृत्तांकनात आम्ही रात्री होणारी बेकायदेशीर वाळू वाहतुक कोण रोखणार असा प्रश्न उपस्थित केला होता आणि सायंकाळीच ही बाब समोर आली. राजरोसपणे एक ट्रक वाळू वाहतुक करतांना दिसला.
काल रात्री 8.50 वाजता शिवाजीनगर भागातील उड्डाणपुल उतरल्यानंतर डावीकडच्या रस्त्याने एक ट्रक मुख्य रस्त्यावर आला. या ट्रकमागेच दुचाकीवर चालक त्याचे फोटो आणि व्हिडीओ शुटींग घेण्यात आली. ही गाडी एसबीआय बॅंकेपर्यंत गेली आणि त्यानंतर उजवीकडे उळली आणि शुटींग समाप्त झाली. यावरून महसुल कायद्यात लिहिल्याप्रमाणे सुर्यास्त ते सुर्योदय या वेळेत वाळूची वाहतुक करताच येत नाही. तरीपण ही वाळूची वाहतुक सुरुच आहे.
काल महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या मोठ्या लव्याजव्याने मिळून गोवर्धनघाट परिसरात नदीतून वाळू काढणाऱ्या अनेक तराफ्यांना पकडून नदी काठी त्यांना जाळून टाकण्यात आले. हे एकूण 64 तराफे होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह असंख्य अधिकारी आणि महसुलचे कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते. या कामाचे वृत्तांकन करतांना आम्ही कालच वाळूची रात्रीतून होणारी वाहतुक कधी थांबेल असा प्रश्न उपस्थित केला होता. आमचा प्रश्न खराच ठरला आणि रात्री 8.50 वाजता बेकायदेशीर वाळूची वाहतुक करणारा ट्रक सापडलाच.
यावरून वाळूच्या वाहतुकीवर, अवैध उत्खननावर आळा बसत नाही. हे स्पष्टच आहे. पण का बसत नाही आळा, कोठे आहे ती मेख हे शोधण्याची गरज आहे. कारण बेकायदेशीर काम करून शासनाचे उत्पन्न बुडवणाऱ्यांना कायद्याचा हात दाखवायलाच पाहिजे. पण हात दाखवण्याची जबाबदारी असणाऱ्यांचे हात वाळूतील ओलाव्याने ओले होतात. त्यामुळे कार्यवाही करतांना त्यांची लेखणी चालत नसेल असे म्हणता येईल असो फुकटात रेती उत्खनन, बेकायदेशीर रित्या रात्रीतून वाळूची वाहतुक होणारच आहे. तर मग मागील कांही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे विष्णुपूरी धरण भरले. धरणातील कांही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणासमोर असलेल्या भागांमध्ये आता रेतीची वाढ होणारच आहे. गरीब लोकांचे तराफे जाळून काय फायदा 25-35 लाखांच्या गाड्यांमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुक होते त्याचे काय? फुकटात पोकलॅंडने वाळू उत्खनन होत आहे. त्यामुळे वाळू घाटांचे लिलावपण कोणी घेत नाही अशा परिस्थितीत शासनाचे काम सांभाळणाऱ्या प्रशासकीय लोकांना पुन्हा एकदा आपल्या कामासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
