ताज्या बातम्या

नांदेड येथील तरुणाचा औंढा-जिंतूर रोडवर अपघातात मृत्यू

बोलेरो जीप व मोटर सायकलची समोरासमोर धडक
औंढा नागनाथ(प्रतिनिधी)- जिंतूर-औंढा नागनाथ रोडवर कृषी महाविद्यालया नजीक बोलेरो जीप व मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकल ठार झाल्याची घटना 22 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.
सविस्तरवृत्त मयत परितोष मानव कुंडलवाडीकर (वय 37 वर्षे) हा नांदेडवरून पुणेकडे जात असतांना त्याने जिंतूर औंढारोडवरून आपले वडील मानव कुंडलवाडीकर यांना फोन केला व माझ्याकडे पैसे कमी आहेत पुण्याला जाण्यासाठी त्यामुळे तो परत जिंतूरकडून नांदेडकडे एम.एच.26 बी.एफ. 8782 या मोटरसायकलने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो जीप क्रमांक एम.एच.22 ए.एन.2833 ने समोरासमोर धडक दिल्यामुळे मोटरसायकलस्वार परितोष कुंडलवाडीकर ह्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार निवृत्ती बडे व पोकॉं गणेश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले व मयत मोटरसायकलस्वरांना ताबडतोब घटनास्थळावरून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात मयतचे वडील मानव चंद्रकांत कुंडलवाडीकर,डॉ.प्रशांत दवणे सर्व राहणार राजेश नगर तरोडा नाका नांदेड हे दवाखान्यात आले व त्यानंतर वैद्यकीय प्रक्र्रियया पुर्ण करून मयताची पार्थिवदेह ेकुटुंबांना देण्यात आले. या प्रकरणी औंढानागनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *