नंादेड(प्रतिनिधी)-पंढरपूरच्या माऊलीची आराधना करणारे वारकरी हे अत्यंत शिस्तबध्द आणि काटेकोर भक्त आहेत याबाबत अनेकदा त्यांची प्रशंसा झालेली आहे. यंदाच्या पंढरपूर वारीसाठी शासनाने मर्यादीत परवानगी दिल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करत आज 21 जून रोजी अनेक वारकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष टाळ, मृदंग, विणा यासोबत भजन करतांना दिसत होते.
आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष माऊलीच्या वारीसाठी त्यात खंडपडू देणार नाही, माझी पायी वारी माझी जबाबदारी खंडीत होऊ देणार नाही या विषयाला अनुसरून अनेक वारकऱ्यांनी भजन आंदोलन केले. आमच्या वारीमध्ये खंड होऊ देणार नाही शासनाच्या नियमाला मानन्यास तयार आहोत आम्हाला वारीची परवानगी मिळावी या मागणीसाठी आज भजन आंदोनल करण्यात आले. श्रीक्षेत्र पंढरपूर, श्री विठ्ठल आणि रुक्मीणी मातेचे मंदिर हे वारकरी भक्तांच्या दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या भजन आंदोलनात विविध वारकरी मंडळांतर्फे त्यांचे प्रतिनिधी, अखिल भारतीय भागवत धर्म सभेचे ह.भ.प.अरविंद महाराज, संत तुकाराम महाराज संस्थान सोनखेड, पायी दिंडीचे ज्ञानोबा महाराज, प्रभु पाथरडकर, देविदास लाठकर, उत्तम कदम, अर्जुन महाराज, गजानन महाराज, बालाजी महाराज, लक्ष्मण पाटील, वसंत पानपट्टे, प्रल्हाद बापूराव यन्नावार, प्रकाश महाराज डांगे, मारोती महाराज जागापूरे, बालाजी महाराज कदम आदी भक्तमंडळी या भजन आंदोलनात सहभागी झाली होती.
