अर्धापूर (प्रतिनिधी)तालुक्यातील रोडगी येथील दोन घरी अज्ञात चोरट्यांनी दि.२० रविवारी रोजी रात्री सव्वा लाखाचे दागीने व साड्या चोरून नेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री घडली असल्याची माहिती रोडगी गावकऱ्यांनी दिली आहे.
रोडगी येथील मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दिगंबर कदम यांच्या घरी नगदी ३०,००० हजार रुपये,९ ग्रामची पोत किंमत ४५ हजार,१५ हजार रुपयांच्या पाटल्या असा ९० हजार रुपयांच्या एवज पळविला तर भुजंगराव कदम यांचे ३००० रू नगदी, कानातील झुमके ३ ग्राम किंमत १५ हजार रुपये,२० साड्या असा २५ हजार रुपयांच्या एवज अज्ञात चोरट्यांनी कपाट,पेटी फोडून सोन्याचे दागिने व नगदी पैसे
चोरून नेले तसेच ४ ते ५ घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती गावकऱ्यांनी केली आहे.
रोडगी येथील अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त पोलीसांनी करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.