

नांदेड,(प्रतिनिधी)- युवक कांग्रेस चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांची जिंतुर-गंगाखेड विधानसभा निरीक्षकपदी पक्षाच्यावतिने निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या माध्यमातुन सातत्याने मागील दहा वर्षा पासुन निष्ठावंत म्हणुन कार्यरत असताना नुकताच राष्ट्रवादी युवकच्या सुपर 100 उपक्रम हाती घेतला असून कार्याची दखल घेत प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील साहेब आणि युवक कांग्रेसचे प्रदेश
अध्यक्ष मेहबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्प, सुरज चव्हाण यांच्या आदेशानुसार या 100 विधानसभा मतदारसंघात पक्ष संगठनात्मक बांधणी साठी ग्रंथी यांची निरीक्षक पदी निवड करण्यात आली असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे .