इतर तीन चोऱ्या
नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. किनवट, कंधार येथून दोन दुचाकी गाड्या आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पत्रे चोरीला गेले आहेत. एकूण 4 चोरी प्रकरांमध्ये 2 लाख 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
शेख अकरम शेख नयुम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जूनच्या रात्री 8 ते 9 त्यांचे हदगावच्या रजानगर येथे असलेले घर बंद करून ते एका लग्न कार्यक्रमात गेले होते.या एक तासाच्या दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम 750 ग्रॅम चांदीचे दागिणे 50 हजार रुपयांचे असा एकूण 2 लाख 20 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक विठुबोने हे अधिक तपास करीत आहेत.
शाहुनगर गोकुंदा किनवट येथून 17 जूनच्या रात्री 11 ते 18 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान पांडूरंग रामजी माने यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एक्स 5965 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार कोलबुध्दे हे करीत आहेत.
सुभाष बालाजी कोराळे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एम.7084 ही 16 जूनच्या रात्री 9.30 ते 17 जूनच्या पहाटे 6.30 वाजेदरम्यान बहाद्दरपुरा कंधार येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार टाकरस हे करीत आहेत.
हर्षवर्धन गोविंद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 जूनच्या सकाळी 6 ते 17 जूनच्या सकाळी 11 वाजेदरम्यान त्यांच्या मोकळ्या भुखंडावर सुक्या विटांनी बांधलेल्या दोन खोल्यांवरील 19 हजार रुपये किंमतीची 9 टीनपत्रे कोणी तरी चोरून नेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार गवळी हे करीत आहेत.