नांदेड

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे आंदोलन

खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्पदिन म्हणून साजरा
नांदेड – काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस आज संपूर्ण देशभर संकल्प दिन म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला. या संकल्पदिनी जनसामान्यांविरुध्द केंद्र शासनाने राबविलेल्या धोरणांच्या निषेधार्थ नांदेड शहर व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसच्यावतीने येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत आज आंदोलन केले.   शेतकर्‍यांविरुध्द पाशवी बहुमताच्या आधारावर संसदेमध्ये मंजूर केलेले काळे कायदे, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस यांच्या वाढलेल्या किंमती, खाद्यतेल, डाळी व इतर जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीने आकाशाला घातलेली गवसणी. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. या नागरिकांच्या भावना निर्ढावलेल्या केेंद्र शासनापर्यंत पोेंहचविण्यासाठी संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्येही केंद्र शासनाविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी केले. या आंदोलनासाठी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. या आंदोलनात महिला काँग्रेसचा मोठा सहभाग होता. आजच्या आंदोलनामध्ये नांदेड दक्षिणचे आ.मोहनअण्णा हंबर्डे, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनीबाई येवनकर, उपमहापौर मसूद खान, सभापती संगीता पाटील डक, डॉ.रेखा चव्हाण, मंगलाताई निमकर, अनिता इंगोले, सुमती व्याहाळकर, कविता कळसकर, अनुजा तेहरा, मंगला धुळेकर, जयश्री राठोड, हाफिज, सतीष देशमुख तरोडेकर, शमीम अब्दुल्ला, अब्दुल लतीफ, नागनाथ गड्डम, अब्दुल गफार, रहिमखान, किशान कल्याणकर, सुरेश हटकर, रमेश गोडबोले, भालचंद्र पवळे, संतोष मुळे, सुमित मुथा, धिरज यादव, जगदीश शहाणे, नारायण श्रीमनवार, उमाकांत पवार, दिशेन मोरताळे, अजीज कुरेशी, नासेर, साहेबराव सावंत, सलाम चावलवाला, चाँदपाशा कुरेशी, मुन्तजीब, रहिम पठाण, संघरत्न कांबळे, अविनाश कदम, संजय वाघमारे, हंसराज काटकांबळे, ललीता कुंभार, पद्मा झंपलवाड, सुषमा थोरात, जेसीका शिंदे, अरुणा पुरी आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *