नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बाजीराव हंबर्डेचे मारेकरी 36 तासात शोधले आहेत. एक महिला आणि एक पुरूष असे दोन जण पोलीसांच्या त ाब्यात आहेत. त्यांनी बाजीराव हंबर्डेचा मोबाईल पोलीसंाना दिल्याची माहिती आहे.
17 जून रोजी सकाळी 5 वाजता सिडको ते वाघाळा जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 बी.जी.4543 अडवी पडलेली होती आणि एक ा 35 वर्षीय माणसाचा मृतदेह तेथे होता. जनतेतील लोकांनी पोलीसांना माहिती दिल्यानंतर नांदेड ग्रामीणचे रात्रीतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार तेथे पोहचले. थोडया वेळात हा मृतदेह बाजीराव पंडीतराव हंबर्डे यांचा असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली. त्यानंतर आ.मोहनराव हंबर्डे तेथे पोहचले आणि त्यानंतर बाजीरावचे बंधून प्रविण पंडीतराव हंबर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द अज्ञात कारणासाठी बाजीराव हंबर्डे यांचा खून केल्याचा गुन्हा क्रमांक 392/2021 दाखल झाला. बाजीराव हंबर्डे यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शेख असद त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार दत्ता पवार, प्रमोद कऱ्हाळे आणि विश्र्वनाथ पवार यांनी आज 18 जूनच्या सायंकाळी 7 वाजता एक महिला आणि एका युवकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. ताब्यात घेतलेला युवक औद्योगिक परिसरात एका पोहा मिलमध्ये काम करतो. ताब्यात घेतलेली महिला हंबर्डे कुटूंबियांच्या घरातच कुठे तरी काम करत होती अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. याही पुढे प्राप्त झालेल्या माहितीनुसार बाजीराव हंबर्डेचा खून सिडको भागातील एका घरात महिलेच्या ओढणीने गळा दाबून करण्यात आलेला आहे आणि नंतर त्यांचा मृतदेह वाघाळा रस्त्यावर मोटारसायकलच्या माध्यमातून नेऊन टाकण्यात आलेला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेली ही कार्यवाही प्रशंसनिय आहे.
