नांदेड (ग्रामीण)

हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर परिसरात नवजात बालकाचे अर्भक आढळले

सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदीनवार यांच्या तत्परतेने मुलीचा जीव वाचला
ग्रामीण रुग्णालय येथे अर्भकावर  उपचार सुरू

नांदेड (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे घारापुर परिसरातील एका नालीमध्ये नवजात मुलीचे अर्भक आढळले या मानवतेला कलंक लावणाऱ्या कृत्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या घटने विरूद्ध हिमायतनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तासाप सुरू आहे.
तालुक्यातील घरापुर ते विरसनी परिसरातील एका नालीमध्ये एका पिशवीत टाकून फेकून दिलेले 2 दिवसाच्या मुलीचे अभंग हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदीनवार हे त्या दिशेने जात असताना त्यांना लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी या आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता एक लहान बाळ कपड्यात गुंडाळून एका नाल्यात  पडलेले त्यांना आढळून आले. सदर घटना घारापूर येथील पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सरकारी डॉक्टर व पोलीस ठाण्याला कळ विली त्यानंतर शहरातील  सामाजिक कार्यकर्ते व पो. नि  यांच्या तत्परतेने त्या नवजात बालकास हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावेळी येथील डॉक्टरांनी असे सांगितले की हे नवजात मुलीचे बाळ दोन दिवसापूर्वी जन्माला आले आहे त्याचे वाजत 3 किलो 15 ग्राम आहे त्यावर हिमायतनगरीतील ग्रामीण रुग्णालय येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या देख रेखी.खाली उपचार सुरू आहे असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफीक सेठ, किसान सेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश जाधव, वैद्यकीय कर्मचारी ,पत्रकार व  प्रशासकीय अधिकारी  व कर्मचारी  उपस्थित होते या घटनेचा पुढील तपास पो. नि. भगवान कांबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *