नांदेड (प्रतिनिधी)- एकरकमी एफआरपी न दिलेल्या कारखान्यांकडून दुस-या टप्प्यात देण्यात येणा-या एफआरपी रकमेवर पंधरा टक्के व्याज आकारूनच देण्यासाठी सर्व कारखान्यांना आदेशित करावे तसेच पूर्ण एफआरपी किती दिवसात देणार याचा खुलासाही घ्यावा अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
शुगरकेन ऍक्ट 1966 ची पायमल्ली करून कारखानदारांनी एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार केले व एकरकमी एफआरपी न देता टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याची पळवाट स्वीकारली.ऊस गाळपाला गेल्याच्या नंतर चौदा दिवसांत एक रकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे.परंतु बेकायदा केलेल्या करारांचा गैरफायदा घेत कारखानदार टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याची भूमिका घेत आहेत असे असले तरी त्यांना दुस-या टप्प्यात देण्यात येणा-या थकीत एफआरपी रकमेवर चुकणार नाही त्यांना व्याज द्यावेच लागेल कारण एफआरपी टप्प्याटप्प्याने दिली तरीही त्यांना विलंब व्याज द्यावेच लागणार आहे कारण चौदा दिवसांनंतर देण्यात येणा-या एफआरपी रक्कमेवर 15 टक्के नुसार व्याज आकारणी करुनच शेतकऱ्यांना थकीत रक्कम व्याजासह द्यावी असे कायद्यात स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे ज्या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली नाही अशा साखर कारखान्यांचा दुसरा हप्ता देण्यापूर्वी विलंब रकमेवर व्याज आकारणी करुनच शेतकर्यांना ती रक्कम द्यावी करिता साखर आयुक्त कार्यालयाने सर्व कारखान्यांना स्पष्ट आदेश द्यावेत व पूर्णा एका एफआरपी रक्कम किती दिवसांत देणार याचाही खुलासा करावा जे कारखाने थकीत एफआरपी रकमेवर विलंब व्याज देणार नाहीत यांच्यावर आरआरसी कार्यवाही करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी राज्याचे सहकार सचिव, साखर आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
