पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी…..
अर्धापूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी ‘ ही मोहीम राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली
राबविण्यात आली . दि १८शुक्रवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यास सुरूवात करण्यात आली असून केंद्र सरकारने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड.सचिन जाधव यांनी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभरातून एक कोटी पत्र पाठविण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली.
राष्ट्रवादी युवक प्रदेशा स्तरावरील आदेशाच्या अनुषंगाने मराठा समाजाला केंद्र सरकारने त्वरीत आरक्षण द्यावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अर्धापूर च्या वतीने पोस्टात पत्र पाठविण्याची सुरूवात करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड. सचिन जाधव यांनी दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर चे जिल्हाध्यक्ष अँड.सचिन देशमुख,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप राऊत,माजी तालुकाध्यक्ष उध्दवराव राजेगोरे,वैजनाथ धुमाळ,अध्यक्ष ओमप्रकाश पत्रे,अजित गट्टानि,मंजूर भाई,कोडिबा देशमुख,अमोल देशमुख,प्रसाद पाटिल ,राम कदम,सुहास देशमुख,गजानन माटे यांच्या राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
