नांदेड जिल्ह्यातील 9 जणांचा समावेश त्यातील एक तुरूंगात
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने 786 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देण्यासाठी एक विचाराधीन यादी तयार केली आहे. त्यामध्ये नांदेड येथील 9 जणांचा समावेश आहे. या 9 जणांमधील एक सध्या तुरूंगात आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक कुलवंत सारंगल यांनी निर्गमित केलेल्या एका निवड सुचीनुसार राज्यभरातील 786 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदावर पदोन्नती देणे आहे. याबाबतची सर्व माहिती संबंधीत घटक प्रमुखांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला पुरवायची आहे. आपल्या अखत्यारीत काम करणाऱ्या सर्व सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या संदर्भाने सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे असे आदेश देण्यात आले आहेत.
या यादीमध्ये सध्या अटकेत असलेल्या अनेक सहाय्यक पोलीस निरिक्षकांची नावे आहेत. नांदेड येथील दिनेश दिगंबर सोनसकर हे सुध्दा एक फसवणूक प्रकरणात सध्या तुरूंगवासात आहेत. त्यांचेही नाव या निवडसुचीमध्ये देण्यात आलेले आहे. नांदेड जिल्ह्यात पोलीस निरिक्षक पदोन्नती प्राप्त करण्यास पात्र असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वंभर अर्जुनराव पल्लेवाड, श्रीनिवास गंगाराम रोयलावार, शिवप्रसाद माधवराव कत्ते, शरद सुभाष मरे, भुमन्ना मारोती आचेवाड, कमलाकर नरसींह गड्डीमे, संतोष वैजनाथ केंद्रे आणि फेरोज खान उस्मान खान असे आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाने 786 जणांची निवडसुची जारी करून राज्यातील प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रकरणांना चालना दिली आहे. यामुळे पदोन्नतीचे अनेक प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहेत ते सुटण्यास मदत मिळेल. सोबतच पदोन्नत्या रखडल्यामुळे अनेकांवर होणारा अन्याय रोखला जाणार आहे. सोबतच जी कनिष्ठ पदे तयार होतील त्यानुसार सेवाभरती होण्यास मदत मिळणार आहे म्हणजेच लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अनेक परिक्षा होतील आणि आपल्या परिक्षांसाठी मागील दोन वर्षापासून झटणाऱ्या युवकांना आपल्या पसंतीची सेवा प्राप्त करण्यास संधी मिळेल.
