वर्ताळा तांडा येथील ऊसतोड मुकदम नामदेव राठोड यांनी आपल्या मालकीची मालट्रक क्र.एम.एच.11एम 4559 ही आपल्या घराशेजारी मोकळ्या जागेत लावली होती. अज्ञात चोरट्यांनी दि.13एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी चोरून नेली या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे यांनी तपास सुरू केला. आरोपी हे तालुक्यातीलच असल्याचा सुगावा लागला वेगवान तपास सुरू करून पोलीस उप निरीक्षक गजानन काळे यांनी आरोपी गजानन चव्हाण, गणपत चव्हाण रा.दोघे हारजुतांडा ता.मुखेड, संजय राठोड रा.सन्मुख वाडी,आनंद बद्देवाड रा.बेळी खु,सुर्यकांत श्रीरामे रा.मंग्याळ या पाच जनांना अटक करून साडेतीन लाख रुपये चा मुद्देमाल मालट्रक हस्तगत केला.
