नांदेड(प्रतिनिधी)-17 जूनच्या मध्यरात्री एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीन युवक जागीच मरण पावल्याची घटना धनेगाव चौकात घडली आहे.
पोलीसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरूवारी मध्यरात्री एम.एच.26 9875 या दुचाकी गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात लंकेश साहेबराव गवाले (21), विनोद अनिल दर्शने (19) रा.मारतळा ता.लोहा आणि सतिश रामचंद्र देवकांबळे (20) रा.गवळू ता.कंधार हे तीन युवक जागीच ठार झाले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. मरण पावलेल्या तिन्ही युवकांना शासकीय रुग्णालयात पोहचविण्यात आले. सकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही.
