अर्धापूर (प्रतिनिधी):- येथील सावता परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते गोरखनाथ राऊत यांची सावता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते राजू काळे यांनी दिले.
सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेल असे मत जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोरखनाथ राऊत सत्काराला उत्तर देतांनी व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हासचिव तथा पत्रकार निळकंठ मदने पाटील होते,तर प्रमुख पाहुणे प्रविण देशमुख, पत्रकार लक्ष्मीकांत मुळे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सखाराम क्षीरसागर,सचिव गुणवंत विरकर, गोविंद टेकाळे,अजीत गटाणी, ऊद्धव सरोदे, उमेश सरोदे, छत्रपती कानोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पाहुण्यांचा शाल,हार देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी अध्यक्षीय भाषणात निळकंठ मदने म्हणाले कि, कार्यकर्ते चळवळीत काम केल्याने घडतात,चळवळीत काम करण्यासाठी स्वातंत्र्य असते,जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे” असे ते म्हणाले. यावेळी अनेकांची भाषणे झाली.यावेळी यशवंत गोरे, नितेश माट, भूजंग गोरे,छत्रपती कानोडे,तुकाराम माटे,गुरुराज रणखांब,शंकर हापगुंडे,गोपाळ पंडित,रमाकांत राऊत,रुपेश देशमुख, सतिष तरोडकर,श्याम गीरी,गोपाळ गडगिळे, दिपक राउत, लवराज माटे,गजानन माटे,गजानन राऊत, रवि वाडीकर, तुकाराम माटे, कल्याणकर, ज्ञानेश्वर गोरे, ज्ञानेश्वर माटे, संतोष माटे, शिवानंद कदम,रवि भालेराव,पप्पू राऊत, सतिष माटे,व्यंकटी राऊत, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.तानाजी मेटकर यांनी केले तर आभार सोनाजी राऊत यांनी मानले.