56 वर्षीय माणसाची सोन्याची चैन व अंगठ्या घेवून पोबारा
नांदेड(प्रतिनिधी)-तोतय्या पोलीसांनी नांदेडमध्ये एक हात दाखवून देगलूर गाठले. देगलूर येथे एका 55 वर्षीय माणसाला आम्ही पोलीस आहोत असे सांगून त्यांचा 2 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज घेवून पसार झाले आहेत.
तोतय्ये पोलीस नांदेड जिल्ह्यात पुन्हा अवतरले त्यांनी पहिला झटका नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिला आणि पोलीस असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरीकाची 25 हजारांची सोन्याची अंगठी गायब केली. दि.16 जून रोजी दुपारी 1.45 वाजता तोतय्या पोलीसांनी देगलूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रमोद खुशालराव ठाणेकर यांना गाठले. आम्ही पोलीस आहोत पुढे चेकींग चालू आहे अशी बतावणी करून तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन व बोटातील अंगठ्या काढून दस्तीत बांधून खिशात ठेवण्यासाठी सांगितले. ते सर्व सोने 48 ग्रॅम आहे. याची किंमत 2 लाख 16 हजार रुपये लिहिण्यात आली आहे. तोतय्या पोलीसंानी त्यांची नजर चुकवून ते सोने घेवून चोरून नेले आहे.
घटनेची माहिती मिळताच देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी भेट दिली. घटनेची माहिती घेवून या प्रकरणी दोन अज्ञात लोकांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 416, 379 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 266/2021 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे हे करीत आहेत.
