अर्धापूर (प्रतिनिधी) -आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांची आरोग्य सेवेत महत्वाची भूमिका आहे.मात्र केंद्र आणि राज्य सरकार मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने 15 जून पासून बेमुदत संपावर आहेत.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभाग आणि प्रशासना सोबत कोविड टेस्ट, कोवि ड लसीकरण आदी कामात आरोग्य विभागात अविरत पणे आशा वर्कर व गट प्रवर्तक काम करत आहेत.
मात्र आशा वर्कर्स या शासनाच्या विविध आरोग्य सोयी सवलती पासून वंचित आहेत.त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे.कोरोना काळात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला.पण त्या कुटुंबांना आर्थिक मदत विमा ही मिळू शकली नाही.याबाबत केंद आणि राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने आशा वर्कर ह्या बेमुदत संपावर गेल्या आहेत.
अर्धापूर तालुक्यातील आशा वर्कर यांनी गट विकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी यांना बे मुदत संपाचे निवेदन दिले.याव आशा गटप्रवर्तक व तालुका अध्यक्ष अनिता चव्हाण तालुका सचिव सारजा कदम आशा वर्कर वंदना तिडके वंदना खिलारे सारिका नागठाणे प्रेमाला आठवले, अर्चना इंगोले, माया कांबळे,यशोदा टेकाळे,द्वारका मरकुंदे,प्रतिभा चौरे, अनिता कदम,आदीं संपात सहभागी आहेत.