नांदेड(प्रतिनिधी)-15 हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस भारतीय मुद्रेत बदलण्यासाठी लागणारे ना हरकत, कोरोना कर आणि जीएसटी भरा असे सांगून एका विमा प्रतिनिधीची 1 लाख 13 हजार 995 रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.
विमा प्रतिनिधी वैजनाथराव जीवनराव नायगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जून ते 16 जून दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर विविध दोन मोबाईलवरून फोन आले आणि तुम्हाला 15 हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस लागले आहे असे सांगण्यात आले. ते अमेरिकन डॉलर भारतीय मुद्रेत बदलण्यासाठी जीएसटी, कोरोना कर आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी त्या भामट्यांनी त्यांना एस.बी.आय. बॅंकेचे दोन खाते क्रमांक दिले. त्यावर वैजनाथ नायगावकर यांनी 1 लाख 13 हजार 995 रुपये भरले. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. विमानतळ पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 179/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 ड नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
