नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड नायगाव महामार्गालगत 15-16 जूनच्या रात्री एक दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
16 जूनची पहाट झाल्यानंतर वाजेगाव जवळ एका दुकानाचे शटर वाकडे झालेले दिसले आणि तेथे चोरी झाल्याचा संशय आल. हे दुकान साईबाबा इंटरप्रायझेस नावाचे आहे. या दुकानाचे मालक नरेश चंदनानी हे आहेत. घटनेची माहिती मिळताच दुकान मालक नरेश चंदनानी यांनी हा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीसांना सांगितला. नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक हणंमत गायकवाड, इतर पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी पोहचले.
या बाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार या दुकानातुन अनेक एलईडी, अनेक लॅपटॉप संगणक चोरीला गेले आहेत. त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे असे सांगण्यात आले. दुपारी 4 वाजेपर्यंत तरी या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे आली नव्हती त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला नव्हता. पण पोलीस रात्रीची गस्त करतात तरीपण अशा चोरीच्या घटना घडतच असतात यावर वचक कसा बसेल हा मोठा विषय आहे.