नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या 9 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला नांदेडचे विशेष न्यायाधीश एस.एस.खरात यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
15 जूनच्या मध्यरात्रीनंतर तीन वाजेच्यासुमारास आपल्या घरात 9 वर्षाच्या बालकेने ओरड केल्यानंतर तिची आई याबाबत माहिती घेण्यास गेली असता त्या बालिकेने सांगितले की, बापानेच माझ्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे. बालिकेने सांगितलेल्या शब्दांना लिहिण्याची ताकत आमच्याही लेखणीत नाही. आपल्या मुलीसोबत असे का केले याची विचारणा आईने केली तेंव्हा ही मुलगी माझी नसल्याने असे केले असे तो नराधम आपल्या पत्नीला सांगत होता. या पती-पत्नींना चार मुली आहेत त्या पैकी एकीचे लग्न झाले आहे, एक मामाकडे राहते आणि एक आजी-आजोंबाकडे राहते. सगळ्यात शेवटी 9 वर्षाची बालिका पती-पत्नीसोबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते.
पोलीस निरिक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 387/2021 दाखल करण्यात आला. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 376(3), 376(ए.बी.एफ.जे.)323, 506, 455 (एम) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) च्या कलम 5(एन) 6, 9(एम)9(एन) आणि 10 जोडण्यात आली आहेत.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर यांना देण्यात आला.
आज 16जून रोजी पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर, पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी, माधव गिते, राजरत्न इंगोले आणि गृहरक्षक दलाचे जवान गोपाळ पवार यांनी पकडलेला नराधम बाप बालाजीला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. मनीकुमारी बत्तुल्ला (डांगे) यांनी न्यायालयासमक्ष मांडलेला युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.एस.खरात यांनी आपल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला दोन दिवस अर्थात 18 जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
