नांदेड(प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या हॉटेल व धाबे व्यवसायिकांनी नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आदेश अर्धापूर येथे झालेल्या बैठकीत देण्यात आले.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाच्यावतीने कडक नियम लादण्यात येत आहेत. वेगवेगळ्या अस्थापना कडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे त्यामुळे अर्धापूर पोलीस ठाण्यात हॉटेल व धाबे व्यवसायिकांची बैठक ठेवण्यात आली होती. हॉटेल व धाबे व्यवसायिकांनी दुकाने वेळेत बंद करावी आदी नियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अर्धापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेले नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्ग वरील आदी ठिकाणची धाबे हॉटेल व्यवसायिक यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.नांदगावकर,पोलीस उपनिरक्षक बळीराम राठोड,के.के.मंगरूळकर ,कपिल आगलावे,साईनाथ सुरोशे,विद्यासागर वैद्य,राठोड,किर्तीकुमार रनविर,महेंद्र डांगे,संतोष सुर्यवंशी,पप्पू चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.