क्राईम

शिवाजीनगर पोलीसांच्या हद्दीत सुरू आहेत राजरोस मटक्याच्या बुक्की

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात आणि जिल्ह्यात मटका हा जुगार कधीच बंद झाला नाही. काही काळांमध्ये मटक्याची दुकाने बंद होती. पण आता तर सर्रास दुकानात लाईन लावून आकडे लावले जात आहेत. असाच एक फोटो शहरातील अग्नीशमन कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मटका बुक्कीचा समोर आला आहे.

नांदेड जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र मटक्याचा व्यवसाय अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. त्यात अनेकांचे संसार चालतात. मटका बुक्की चालू देणाऱ्यांना त्यांच्या भाकरीवर तुप मिळते. त्यामुळे मटकाबुक्कीकडे लक्ष देण्याची कोणाची इच्छा होत नाही. महत्वाचा सर्वात मोठा प्रश्न मटक्याच्या बुक्कीवर येणारा आणि आपले पैसे त्यात गुंतवणारा व्यक्ती हा भारतातील सर्व सामान्य व्यक्ती आहे. ज्याच्याकडे भरपूर पैसे नाहीत पण मटका खेळण्याची सवय लागली आहे.
महाराष्ट्र जुगार कायदा ज्यांनी अस्तित्वात आणला त्यांना बहुदा लोकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि भाकरीवरील तुप याची कल्पना नसेल नसता त्यांनी कधीच महाराष्ट्र जुगार कायदा अस्तित्वात आणला नसता. पण सध्या त्या कायद्याकडे रितसर कानाडोळा करून सर्वकांही सुरू आहे. वर्तमानपत्रांनी याविरुध्द बातम्या छापल्या तरीपण आपल्या लाडक्या मटका बुक्कींना सोडून इतरांच्या मटका बुक्कींवर धाड टाकली जाते. तेथे 10 हजार रुपये सापडले तर जप्ती कार्यवाहीमध्ये फक्त 2 हजारच दाखवले जातात. आणि गुन्हा दाखल झाला तरी दहा मिनिटात मटका बुक्की चालकाला जामीन मिळतो. त्या जामीनीसाठी अ लिखीत असलेली एक कायदेशीर फिस आकरली जाते. अशा पध्दतीने हा मटका सुरूच असतो.
शहरातील अग्नीशमन कार्यालयाशेजारी असलेल्या मटकाबुक्कीचा एक फोटो प्राप्त झाला. त्यात एक माणुस मटक्याची चिठ्ठी लिहितांना दिसतो आहे. त्याच्यासमोर दोन वेगवेगळ्या बुक आहेत. म्हणजे मटक्याच्या वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळ्या चिठ्‌ठ्या तेथे फाडल्या जातात. आम्ही हे वृत्त मटका बुक्कीवर कार्यवाही व्हावी म्हणून लिहिलेले नाही कारण कोणाच्या पोटावर पाय देण्याचा आमचा माणस नाही आणि इतरांच्या भाकरीवर येणारे तुप सुध्दा आम्हाला हिरावून घ्यायचे नाही पण काय चालले आहे हे दाखवणे आम्ही कर्तव्य म्हणूनच स्विकारले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *