नांदेड (ग्रामीण)

वऱ्हाड घेवून जाणाऱ्या टेम्पोचा अपघात ; 2 ठार, 45 जण जखमी

मुखेड (प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यातील हाळी येथील व-हाड बिलोली तालुक्यातील कार्ला येथे लग्नकार्यासाठी जात असताना मुखेड शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या ईंद भारत वीज निर्मिती केंद्र समोर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला यात एक जण जागीच ठार तर दुस-याचा नांदेड येथे उपचाराला नेत असताना मृत्यू  झाला झाला असून, जवळपास ४५ जण जखमी झाले आहेत  त्यातील ३० जण गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. सदर घटना सकाळी आकराच्या सुमारास घडली.
        हाळी येथील नरसिंग सोनकांबळे यांच्या मुलाचा विवाह कार्ला ता.बिलोली येथील विजय वाघमारे यांच्या मुलीशी आज संपन्न होणार होता. हाळी येथून सकाळी लवकरच वऱ्हाड कार्ला  या गावाच्या दिशेने निघाले.  अतिशय वेगाने टेम्पो चालवीत असलेल्या टेम्पो चालकाचा त्याच्या वाहनावरील ताबा सुटला व सदर टेम्पो (एम.एच.०४-ई.बी.३५२५) ईंद भारत वीजनिर्मिती केंद्र समोर उलटला
        आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सदर घटना घडली घटना घडताच मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी जाऊन अतिगंभीर रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले पाहता-पाहता इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ही घटनास्थळी बोलवण्यात आल्या व काही वेळातच सर्व जखमींना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेचा घटनास्थळीच प्रशांत जनार्दन सूर्यवंशी रा.हाळी (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला तर नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना एकाचा मृत्यू झाला असून वृत्त लिहीपर्यंत त्यांचे नाव कळू शकले नाही.
     अर्चना सोनकांबळे (वय ३५) माणिक गायकवाड (वय ३५)पिंटू कांबळे (वय ४०) चक्रपाणि सोनकांबळे (वय ३५) अभिनव रविराज (वय १०) चक्रपाणी पुंडलिक सोनकांबळे (वय ३८) प्रजापती मोरे (वय १५) वत्सलाबाई सोनकांबळे (वय ५०) लक्ष्मीबाई सोनकांबळे (वय २५) जयश्री सोनकांबळे (वय ३२),पंचशीला कांबळे (वय ४०) सज्जाबाई गायकवाड (वय ६०) यांच्या सह  पस्तीस जणांना गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.  तर मुखेड येथे बारा ते पंधरा जणांवर उपचार सुरू आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *