क्राईम

मिल्लतनगर भागात फायरींग करून 57 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या बचतगटाची मिटींग संपवून जाणाऱ्या एका व्यक्तीला दोन दरोडेखोरांनी मारहाण करून, बंदुकीतून फायरींग करून त्याचे 57 हजार रुपये लुटल्याचा प्रकार सकाळी 10 वाजता मिल्लतनगर भागात घडला आहे.
रोहित गुगले हे के्रडीट ऍक्सीस ग्रामीण लि.मध्ये केंद्र व्यवस्थापक आहेत. आज सकाळी 8 वाजता एका बचगटाच्या मिटिंगसाठी गेले होते. तेथून बचत गटाचे 57 हजार रुपये घेवून आपल्या दुचाकीने परत जात असतांना मिल्लतनगर भागात त्यांच्या पाठीमागून दोन जण दुचाकीवर आले आणि ज्यांनी आपले तोंड पुर्णपणे बांधून ठेवलेले होते. रोहित गुगलेच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी उभी करून त्यांच्या दुचाकीची चाबी काढून घेतली. त्यांच्या तेथे एका भिंतीवर गावठी कठयातून फायरींग केली आणि रोहितकडील 57 हजार रुपयांची बॅग बळजबरीने चोरून नेली आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे साहेबराव नरवाडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती घेवून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा सुर्यप्रकाशाच्या उजेडात फायरींग करून झालेली ही लुटीची घटना नक्कीच चिंता तयार करणारी आहे. इतवारा पोलीस याबद्दलची माहिती जमा करत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *