

नांदेड,(प्रतिनिधी)- आज पहाट होण्या अगोदर माहूर पोलिसांनी `एका ढाब्यात दडवून ठेवलेला २ लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला आहे.
माहूरचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव मुद्दे आणि त्यांच्या सहकारी अमलदारानी माहूर जवळ असलेल्या विक्की ढाब्यात रात्री धाड टाकली, त्या ठिकाणी साठवलेला प्रतिबंधित असलेला गुटखा साठवलेला होता. चार नायलॉन पोत्यांमध्ये बहरलेला पोलिसांनी जप्त केला आहे.त्या ठिकाणी सापडलेल्या गुटख्याची किंमत २ लक्ष रुपये आहे.याबाबत माहूर पोलिसांनी विजय कबीरदास कांबळे, वय-49 वर्ष विरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नामदेव मुद्दे हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस उप अधीक्षक मंदार नाईक,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी माहूर पोलिसांचे कौतुक केले आहे.