भोकरमध्ये पोलीसाचे घर फोडले
नांदेड(प्रतिनिधी)-पायी जाणाऱ्या पती-पत्नीला मोटारसायकलवर आलेल्या चोऱ्यांनी झटका देत पत्नीच्या गळ्यातील 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून नेल्याचा प्रकार राजगड नगर ते सांगवी रस्त्यावर घडला आहे. भोकर पोलीस वसाहतीतून चोरट्यांनी एक घर फोडले आणि 65 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
प्रल्हाद वाघजी वडदकर हे शिक्षक आपल्या पत्नीसह 14 जून रोजी दुपारी 4.30 वाजेच्यासुमारास राजगड नगर ते सांगवी येथे जात असतांना जे.के.बार समोर एका मोटारसायकलवर दोन चोरटे आले आणि चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने तोडून नेले आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
पोलीस वसाहत भोकर येथील मोहन शिवाजी खेडकर यांचे घर 9 जूनच्या सकाळी 6 ते 13 जूनच्या सकाळी 7.30 वाजेपर्यंतच्या वेळेत कोणी तरी फोडले आहे. त्यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीचे इंजिस तोडून हात घालून दाराची कडी काढली आणि चोरट्यांनी घरात प्रवेश केला. अलमारीचे लॉक तोडून त्यातील 13 ग्रॅम सोन्याचे गंठण 65 हजार रुपये किंमतीचे चोरट्यांनी लांबले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक ए.व्ही. कांबळे अधिक तपास करीत आहेत.
