65 वर्षीय व्यक्तीचे अंगठी घेवून गेले
नांदेड(प्रतिनिधी)-कांही दिवसांपुर्वीपर्यंत बनावट पोलीसांचे वास्तव्य नव्हते पण प्रकाशनगर पाटी जवळ दोन जणांनी आम्ही पोलीस असल्याचे भासून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली आहे. खरे पोलीस काम करत नाहीत म्हणूनच बनावट पोलीसांची चलती झाली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात खऱ्या पोलीसांमध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेतून एक दुसऱ्याला अडकविण्याची चिंता पोलीसांना पडली आहे. कांही पोलीस अधिकारी तर इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कशा पध्दतीचे गुन्हे दाखल करता येतील याची आखणी करत आहेत. आपल्या तुंबड्या भरण्यात मग्न असलेले पोलीस अधिकारी पोलीसांचे काम सोडून सुपाऱ्या घेवून आरोपी करण्याचे काम करत आहेत. अशा परिस्थितीत ज्यांनी बनावट पोलीस बनून तोतये गिरी करण्याचे ठरवले आहे. त्यांचा तर तो धंदाच आहे. त्यामुळे तोतया पोलीसांचीच चलती झाल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे.
झाले असे की, दत्ता केरबा वाघमारे (65) हे सेवानिवृत्त व्यक्ती 14 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रकाशनगर पाटीजवळ आले होते. त्यांना दातांच्या दवाखान्यात जायचे होते. त्यावेळी त्यांच्याकडे दोन जण आले आणि आम्ही पोलीस आहोत असा बनावटपणा करून त्यांच्या हातातील 7 ग्रॅम सोन्याची अंगठी 25 हजार रुपये किंमतीची हात चालाखी करून काढून घेवून फसवणूक केली आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 189/2021 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.