नांदेड (प्रतिनिधी) – न्यायालयातील कर्मचारी आणि अधिकारी ज्यांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे त्यांच्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रम घ्यावा अशी मागणी सुरेंद्रसिंघ लोणीवाले यांनी केली आहे.
जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात ऍड. सुरेंद्रसिंघ लोणीवाले यांनी असा प्रस्ताव सादर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात आपल्यासोबत दैनंदिन कामकाज करणारे आपले न्यायालयीन सहकारी बांधव आणि न्यायालयीन कर्मचारी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, त्यामुळे आपल्या अभिवक्ता संघाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
आपली जबाबदारी म्हणून अभिवक्ता संघाच्यावतीने एक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन अभिवक्ता संघाने करावे अशी मागणी ऍड. सुरेंद्रसिंघ लोणीवाले यांनी केली आहे.
