नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील सिडको भागात राहणार्या भुमि अभिलेख कार्यालयातील सेवानिवृत्त उपअधीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी ५ लाख ५६ हजार रूपयंाचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
उपअधीक्षक भुमिअभिलेख या पदावरून सेवानिवृत्ती झालेले केरबा नागोजी जेठेवाड यांचे घर वसंतराव नाईक कॉलेजसमोर आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १२ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सर्व कुटूंबीय भोजन करून झोपले असताना रात्री ११.३० वाजता विद्युत पुरवठा बंद झाला. त्यावेळी मुख्य दरवाज्याला कुलूप मी, माझी पत्नी व मुलगी दुसर्या मजल्यावर झोपण्यासाठी गेलो. विद्युत पुरवठा खूप उशीरा पुर्ववत झाला. त्यामुळे आम्ही वरच झोपून होतो. १४ जूनच्या सकाळी ५.३० त्यांच्या पत्नी शारदाबाई खालच्या मजल्यावर आल्या आणि साफसफाई करत असताना घराचे चॅनेल गेट कुलूप तोडून उघडे दिसले. तेव्हा पत्नीने मला बोलविले, तपासणी केली असता घरातील २ कपाट फोडलेले होते. त्यातून सुनबाईने २०१८ मध्ये खरेदी केलेले सोने ज्यामध्ये सोन्याच्या तीन पाटल्या ९० हजार रूपये किंमतीच्या, सोन्याची मिनी गंठन दीड तोळ्याचे किंमत १५ हजार रूपयांचे, सोन्याचे लांब गंठन अडीच तोळ्याचे ७५ हजार रूपये किंमतीचे, कानातील सोन्याचे ५ ग्रॅम दागिने १५ हजार रूपये किंमतीचे. मुलगा त्र्यंबक जेठेवाड खरेदी केलेल्या दागिन्यापैंकी १ तोळे सोन्याच्या ३ अंगठ्या ९० हजार रूपये किंमतीच्या, दुसर्या ४ अंगठ्या ६० हजार रूपये किंमतीच्या आणखीन २ अंगठ्या ६० हजार रूपये किंमतीच्या, सोन्याचे लॉकेट ६० हजार रूपये किंमतीचे, चांदीची १० तोळ्याची चैन ६ हजार रूपये किंमतीची. पत्नी शारदाबाई जेठेवाडने खरेदी केलेले १ तोळ्याची एकदानी १० हजार रूपये किेमतीचे, एक तोळे सोन्याची लांब पोत १० हजार रूपये किंमतीचे, १ तोळे सोन्याचे चुंपल १० हजार रूपये किंमतीचे, सोन्याची ठुसकी १६ हजार रूपये किंमतीची, सोन्याच्या काड्या आणि दोन ग्रॅमचे ओम ९ हजार रूपये किंमतीचे असे सर्व मिळून १८.७ तोळ्याचे दागिने आणि १८.७ तोळे वजनाचे दागिने आणि १० तोळ्याचे चांदीची चैन असा एकूण ५ लाख ५६ हजार रूपयांचा ऐवज १४ जूनच्या रात्री १ ते पहाटे ४ वाजेदरम्यान चोरीला गेला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून प्रभारी पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेख असद करीत आहेत.
