क्राईम

दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले

विविध चोरी प्रकरांमध्ये 1 लाख 76 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-मोरे चौक ते आशा हॉस्पीटल दरम्यान स्कुटीवरून जाणाऱ्या आई आणि मुलीला लुटण्यात आले आहे. शाळेतील कुलूप तोडून 40 हजारांची चोरी झाल्याचा प्रकार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा येथे घडला आहे. साधना नगर देगलूर येथून एक मोबाईल चोरीला गेला आहे. सांगवी (बु) नांदेड आणि मुदखेड रेल्वे स्थानकाच्या रस्त्यावरून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकरांमध्ये 1 लाख 76 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पंकजा चंद्रकांत केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 जून रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास त्या आणि त्यांची मुलगी मोर चौक ते आशा हॉस्पीटल दरम्यान आपल्या दुचाकीवरून वजिराबादकडे जात असतांना एका दुचाकी गाडीवर ट्रीपल सीट आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून पळून गेले आहेत. या ऐवजाची किंमत 65 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक प्रशांत जाधव अधिक तपास करीत आहेत.
पिरबाबू अब्दुल खादर सय्यद हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा येथे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 जूनच्या सायंकाळी 5 ते 13 जूनच्या पहाटे 9.30 वाजेदरम्यान कामठा येथील शाळेचे कुलूप तोडून कोणी तरी शाळेतील इर्न्व्हटर, बॅटरी, मॉनीटर, पीसीयू, युपीएस अशा 40 हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार लोखंडे अधिक तपास करीत आहेत.
सुनिल सोपानराव पाळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साधनानगर देगलूर येथे त्यांच्या घराचे दार उघडे होते. त्या दरम्यान 5 जून रोजी सकाळी 7 ते 7.30 अशा अर्ध्या तासाच्या वेळेत चॉर्जिंगला लावलेला त्यांचा 11 हजार 500 रुपयांचा मोबाईल कोणी तरी चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शेख हे अधिक तपास करीत आहेत.
मधुसुदन आबाराव कोकाटे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.2749 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 7 जूनच्या रात्री 8 ते 8 जूनच्या पहाटे 4 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
विठ्ठल दत्ता शिंदे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.4438 ही रेल्वे स्थानक मुदखेड रस्त्यावरून 12 जूनच्या सकाळी 11 ते दुपारी 1 अशा दोन तासाच्या वेळेत चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बी.डी. ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *