ताज्या बातम्या

जातीवाचक शिविगाळ : मरवाळी येथील चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद

नायगाव (प्रतिनिधी)- मोटारसायकलला कट तर मारलीच पण याचा जाब विचारल्याने द्वेषाने जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना (ता. १३) रोजी रात्री घडली. सदर प्रकरणी संभाजी पुंडलिक मेटकर (२७) यानी दिलेल्या तक्रारीवरुन मरवाळी येथील चौघांच्या विरोधात रविवारी पहाटे अट्रासीटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वादाला अवैध दारू विक्रीची किनार असल्याची चर्चा गावात होत आहे.
या विषयी अधिक माहिती अशी कि, फिर्यादी संभाजी पुंडलिक मेटकर (२७) याच्या मोटारसायकलला (ता.१३) च्या रात्री गावातील एकाने कट मारली. त्यामुळे मेटकर याची मोटारसायकल ट्रक्टरला धडकली यावरून वाद झाला. त्यामुळे नारायण टोपाजी पिंपळे, प्रशांत पवळे, राजू शिवाजी पवळे व हनमंत शिवाजी पवळे या चौघांनी मेटकर यास जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केली. सदर प्रकरणी रात्री उशिरा संभाजी मेटकर यांनी नायगाव पोलीस ठाण्यात वरील चौघांच्या विरोधात रितसर तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात वरील चार लोकांच्या विरोधात अट्रासीटीच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ व नायगावचे पोलीस निरिक्षक रामराव पडवळ यांनी मरवाळी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली.
झालेल्या घटनेबद्दल गावातून अधिकची माहिती घेतली असता (ता.१३) रोजी फिर्यादी आणि आरोपी यांच्यात दारु पिवून शिविगाळ केल्याच्या प्रकरणावरून किरकोळ वाद निर्माण झाला होता. तेव्हा काही जेष्ठ मंडळीनी यात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनाच अरेरावीची भाषा वापरण्यात आली होती आणि पुन्हा त्यांच्यावरच गुन्हा नोंद करण्यात आल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *