

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात वाजेगाव पुलाजवळ एका अनोळखी 25 ते 30 वर्ष वयाच्या माणसाचा मृतदेह सापडला आहे. पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांनी या माणसाची ओळख पटविण्यासाठी जनतेने मदत करावी.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाजेगाव पुलाजवळ गोदावरी नदीपात्रात 25 ते 30 वर्ष वयाचा अनोळखी माणुस मृत आवस्थेत सापडला आहे. या माणसाचा रंग गोरा आहे. दाढी काळी आणि वाढलेली आहे. मिश्या आहेत. त्याने स्पोर्टस बनियान आणि जीन्स पॅन्ट परिधान केले आहे. त्याच्या हातावर ए हे इंग्रजी अक्षर गोंदलेले आहे. डाव्या हातावर ब्लेडने चरपटी अशा जखमा दिसत आहेत.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला असून त्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे हे करीत आहेत. त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, लिहिलेल्या वर्णनाचा माणुस कोणाच्या ओळखीचा असेल तर त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-226373 यावर आणि पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांचा मोबाईल क्रमांक 9890186722 यावर सुध्दा माहिती देता येईल.