नांदेड (प्रतिनिधी)-वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप चौकात असलेल्या भव्यदिव्य अशा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास आज असंख्य बांधवांनी कोविड-१९ चे नियम पाळून त्यांना विनम्र अभिवादन करुन त्यांच्या कार्याचा जयघोष केला.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना रुग्ण संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर या जयंतीच्या निमित्ताने कुठल्याही मिरवणूका न काढण्याचा निर्णय समाजाने घेतला. आजही नांदेड शहरातील कोरोना रुग्णांची कमी होत असली तरी हा प्रभाव वाढू नये यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८१ वी जयंती साधेपणाने मात्र पुतळा परिसरात उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय समाजातील काही सुजाण मंडळींनी घेतला. त्यानुसार आज नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे नांदेडात आल्यानंतर समाजातील काही ज्येष्ठ मंडळींनी त्यांना विनंती केली की आपण सोहळ्यामध्ये सामील होवून आमचा आनंद व्दिगुणीत करावा त्यास त्यांनी मान्यता दिली. आणि आज दिवसभरच्या भरगच्च कार्यक्रमात समाजासाठी वेळ देवून महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येवून त्यांच्या कार्यास अभिवादन करुन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार मोहनराव हंबर्डे, माजीमंत्री डी.पी.सावंत, आमदार अमर राजूरकर, विजय येवनकर, भगवानसिंग चंदेल, बालाजीसिंह चव्हाण, भानुसिंह रावत, अमितसिंह तेहरा, दिलीपसिंह हजारी, अमरसिंह चव्हाण, मोहनसिंह तौर, संजयसिंह बुंदेला, अॅड. दिपक शर्मा, शरदसिंह चौधरी, अर्जुनसिंह ठावूâर, दिलीपसिंघ चौढी, उमेश पवळे, बाबुराव गजभारे, बाबुसिंह चव्हाण, नारायणसिंह चव्हाण, गजेंद्रसिंह चंदेल, धरमपालसिंह बयास, रतनसिंह चव्हाण, शिवराजसिंह तेहरा, प्रमोदसिंह माला, सुनीलसिंह चौधरी, जयपालसिंह चौधरी, गिरीधरसिंह चौधरी, रघुवीरसिंघ हजारी आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज समाजासाठी या कोरोनाच्या काळात देखील समाजासाठी वेळ देवून आपल्या व्यस्त कार्यक्रमात उपस्थिती दर्शविल्याबद्दल भगवानसिंह चंदेल आणि बालाजीसिंह चव्हाण यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले आहेत.
