विशेष

विष्णुपूरी धरण एका आठवड्याच्या आत 91 टक्के भरले; नांदेडच्या नागरीकांना तीन दिवसांआड पाणी

नांदेड(प्रतिनिधी)-यंदा मृगनक्षत्राने ठरलेल्या वेळेत हजेरी लावली. आज 12 जून अर्थात मृगनक्षत्रानंतरचा आठवडा पुर्ण व्हायचा आहे. आणि विष्णुपूरी धरणात 91 टक्के पाणी जमा झाले आहे. पण महानगरपालिकेने नांदेडच्या नागरीकांना तीन दिवसाआड पाणी दिले जात होते.
लॉकडाऊनचा कालखंड असला तरी मृगनक्षत्राने त्याच्या ठरलेल्या वेळेतच हजेरी लावली आणि पावसाने आपल्या उपस्थितीतून सर्वांना आनंद दिला. विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुध्दा पाऊस पडल्याने विष्णुपूरी धरणात येणारी पाण्याची आवक वाढतच राहिली आणि एक आठवडा पुर्ण होण्याअगोदर विष्णुपूरी धरणात 91 टक्के पाणी साचले आहे. ही बज्ञाब नांदेडकरांना आनंद देणारी आहे. पण गेल्या वर्षभरात महानगरपालिकेने नागरीकांना तीन दिवस आड पाणी पुरवठा केला आहे. याची विचारणा महानगरपालिकेला कोण करणार हा प्रश्न तसाच अधांतरीत आहे. पावसाने वेळेवर केलेल्या मेहरबानीमुळे आठ दिवसांच्या आत विष्णुपूरी धरण भरले म्हणजे पाण्याचा साठा विष्णुपूरी धरणात होताच. तरीपण महानगरपालिकेने नांदेडच्या नागरीकांना तीन दिवसाआड एकदा पाणी दिले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *