विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाईल आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घ्या
मुखेड ( प्रतिनिधी ):-स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ,या विद्यापीठाच्या वतीने बी.ए,बी.काॅम,बी.एस.सी च्या उन्हाळी परीक्षा २०२१ करीता, आवेदनपत्र घेण्यात येत आहे.यात उन्हाळी २०२१ च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी नाहक त्रास होणार अल्याने विद्यार्थी नेते पवन जगडमवार यांनी दि १२ जून रोजी उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना मेल पाठवून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी विनंती केली आहे.जर परिक्षा ऑफलाईन पद्धतीने न घेतल्यास महाविद्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिले आहे.
ऑनलाईन पद्धतीने जर परीक्षा झाली.तर ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल त्यामुळे ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी.अशी मागणी विद्यार्थ्यां कडून होत आहे. कारण ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाहीत,अनेक ठिकाणी ग्रामीण भागात आजही इंटरनेट सेवा चालत नाही, अनेक ठिकाणी मोबाईल टाॅवरच नाहीत, त्याच बरोबर सद्या जून महिना चालू असल्याने दररोज पाऊस चालू राहतो,त्यामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा एक एक दिवस खंडित राहतो.त्यामुळे विज पुरवठा उपलब्ध होऊ न शकल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल चार्ज करण्यासाठी चे अडचणी येऊ शकतात.त्याच बरोबर घरात नेटवर्क येत नाही,त्यामुळे डोंगर माथ्यावर ,माळरानावर जाऊन विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा शोधावी लागते.मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने सारखा पाऊस चालू राहतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुठे जाऊन इंटरनेट सेवा शोधावी, पावसाळ्याचे दिवस असल्याने विजा पडणे,पूर येणे अशा नैसर्गिक घटना घडत आहेत.त्यात इंटरनेट किंवा मोबाईल फोन वापरणे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा आहे.
त्यामुळे उच्चशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी आवश्य परीक्षा घ्यावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कांही अडचणी आहेत.ती आपण समजून घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून कोणताही विद्यार्थी परीक्षे पांसुन वंचित राहणार नाही.यासाठी विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१ च्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याचे सुचना सबंधीत विद्यापीठांना देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावे. कोणताही विद्यार्थी परीक्षे पांसुन वचिंत रहाणार नाही.आणि ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांला परीक्षा देतील.