ताज्या बातम्या

हिमायतनगरमध्ये दुकान फोेडून 4 लाख 95 हजार रुपये चोरले

एक जीप आणि चार दुचाकींची चोरी ; 6 लाख 99 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथील एक भुसार दुकान फोडून चोरट्यांनी 4 लाख 95 हजार रुपये रोख रक्कम आणि अनेक कागदपत्र चोरून नेली आहेत. लांडगेवाडी येथून एक जिप चोरीला गेली आहे. लिंबगाव,शिवाजीनगर येथून प्रत्येक एक आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अशा चार दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकारातील लंपास झालेल्या ऐवजाची किंमत 6 लाख 99 हजार रुपये आहे.
अविनाश शंकर संगनवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 जून रोजी सायंकाळी 6.30 ते 10 जूनच्या पहाटे दरम्यान उमरचौक हिमायतनगर येथे असलेल्या त्यांच्या मालकीच्या शंकर ट्रेडींग कंपनी या त्यांच्या भुसार दुकानाचे शटर, कुलूप तोडून चोरट्यांनी आतील काऊंटरमध्ये ठेवलेले 4 लाख 95 हजार रुपये रोख रक्कम तसेच बॅंकेचे पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, आधार कार्ड आणि वाहन चालक परवाना अशी महत्वाची कागदपत्रे चोरून नेली आहेत. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक महाजन अधिक तपास करीत आहेत.
अशोक नागोराव सोलापूर यांनी लांडगेवाडी येथे आपल्या घरासमोर जीप क्रमांक एम.एच.26 व्ही.4458 ही उभी केली होती. दहा जूनच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजता ही जिप चोरीला गेल्याचे दिसले. माळाकोळी पोलीसांनी 1 लाख 10 हजार रुपये किंमत असलेल्या या जीप चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार तिरपणे हे करीत आहेत.
तळणी ते देगाव जाणाऱ्या रस्त्यावर 5 जून रोजी रात्री 8.30 वाजता सुनिल राजेंद्र खिराडे यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एफ.4489 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी उभी केली होती. 6 जूनच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजता ही गाडी चोरीला गेल्याचे दिसले. लिंबगाव पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार अशोक दामोधर अधिक तपास करीत आहेत.
प्रशांत दिलीप लोखंडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.3752 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी कृष्णा अपार्टमेंट नमस्कार चौक येथून 5 जूनच्या रात्री 8 वाजता चोरीला गेल्याचे दिसले. या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार धुळगंडे अधिक तपास करीत आहेत.
शेख गौस महेबुब यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एम.8912 ही 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी शिवनेरीनगर सांगवी येथे दि.9 जून रोजी रात्री 10 वाजता उभी केली होती. 10 जूनच्या सकाळी 5 वाजता ही दुचाकी चोरीला गेली. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद आमेर गुलाम यासीन यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.जी.9138 ही 26 मे रोजी आलीभाई टावर शिवाजीनगर समोर रात्री 10 वाजता उभी केली होती.अर्ध्या तासात ही दुचाकी चोरीला गेली. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक आनंद नरुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार गोटमवार हे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.