नांदेड

विष्णुपूरी धरण 94 टक्के भरले; नदी काठील नागरीकांना सर्तक राहण्याचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी धरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी धरणाची पाण्याची पातळी ही 94 टक्के झाली असून यामुळे धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडू शकतात अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.


गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी मृगनक्षत्राच्या पहिल्याच पावसात मराठवाड्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे नागरीकांना मुभलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून विष्णुपूरी जलाशयाच्या पाणीलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रामणात होत असून विष्णुपूरी धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीत दरवाजे उघडू शकतात. यामुळे गोदावरी नदी काठावरील नागरीकांनी आपले जनावरे व विट्ट भट्टी चालकांनी तसेच संसारपयोगी साहित्य सुरक्षीत स्थळी हलवून सतर्कत राहावे असे आवाहन पुरनियंत्रण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 10 जून ते 15 जूनच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे धरणात पाणी साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल यामुळे विष्णुपूरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडावे लागतील तसेच नांदेड शहरातील नागरीकांना महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करण्यात येतो. सदरील पाणी पुरवठा विष्णुपूरी जलाशयात पाणी कमी असल्यामुळे तीन दिवस आड करण्यात आला होता. परंतू विष्णुपूरी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे जलाशयाची पाण्याची पातळी 94 टक्के प्रमाणात झाली आहे. यामुळे महानगरपालिकेने त्वरीत लक्ष घालून पुन्हा एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *