नांदेड(प्रतिनिधी)-घरातील वाद आणि दारुची नशा काय भयंकर घडू शकते. याचा प्रत्यय आज दि.11 जून रोजी पहाटेच नायगाव तालुक्यातील नरंगल येथे समोर आला. एका नवऱ्याने धार-धार शस्त्राच्या सहाय्याने आपल्या पत्नीचा खून केला आणि नंतर शेतातील झाडा गळफास घेवून स्वत: आत्महत्या केली आहे.
पोलीसंाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नायगाव पासून 15 किलो मिटरच्या अंतरावर असलेल्या नरंगल या गावात 11 मे रोजी सकाळी मुकींदा भुजंग पट्टेकर याने दारुच्या नशेत आपली पत्नी रेणुकाबाईला मारहाण केली. गुरूवारी रात्रीपण रेणुकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. पण हा रोजचा वैताग आहे. हे समजून जीवन जगणारी रेणुका आज सकाळी शेतात बांधलेल्या जनावरांचे दुध काढण्यासाठी शेतात गेली. गुरूवारी रात्री झालेल्या घटनेला पुन्हा उजाळा देत मुकींदा पट्टेकरने धार-धार शस्त्राच्या सहाय्याने रेणुकावर हल्ला करून तिचा खून केला. रेणुका जागीच मरण पावली. त्यानंतर आपल्याच दुसऱ्या शेतातील झाडाला गळफास लावून घेत मुकींदाने आपले जीवन समाप्त केले. घटनेची माहिती मिळताच नायगावचे पोलीस निरिक्षक रामराव पडवळ, पोलीस उपनिरिक्षक बाचावार आणि अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले.
कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दोन्ही प्रेत नातेवाईकांना देण्यात आले आहेत. या संदर्भाने प्राप्त झालेल्या माहितीनुसार शिवाजी मुकींद पट्टेकर याने आपले वडील मुकींद भुजंग पट्टेकर यांच्याविरुध्द तक्रार दिल्याने एका गुन्ह्याची नोंद झाली होती. मुकींदाच्या दारु पिण्याच्या सवईने नरंगल गावातील नागरीक सुध्दा त्याच्यापासून नेहमीच दुर राहत असत. अशा प्रकारे दारुच्या नशेत पत्नीचा खून करून नवऱ्याने स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
