महाराष्ट्र विशेष

नांदेड जिल्हा पोलीस दलात दशकापुर्वी घडलेला ईतिहास पुन्हा एकदा घडणार काय ?

नांदेडचे पालकमंत्री याची पडताळणी करतील!

नांदेड(प्रतिनिधी)-एक दशकापुर्वी नांदेड जिल्हा पोलीस दलात घडलेला ईतिहास पुन्हा एकदा घडविण्याचा प्रयत्न अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. त्या काळी शासनात होते त्यातील एक पक्ष आजही गृहमंत्री पदावर दावा ठेवून आहेत. पण आजच्या नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तो ईतिहास पुन्हा एकदा गिरवायचा आहे काय? याचे उत्तर शोधण्यासाठी कांही दिवस जावे लागतील. रामायनातील रावण आपल्या बंधू बिभिषणामुळेच हरला होतो. हा ईतिहास असाच पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पोलीस दलात बनवला जाणार आहे काय?
एक दशकापुर्वी नांदेडमध्ये पोलीस अधिक्षक पदावर संदीप कर्णीक 8 जून 2010 रोजी रुजू झाले. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण होण्यासाठी आठ दिवस शिल्लक असतांना दि.31 मे 2011 रोजी त्यांची बदली झाली. त्यावेळी अपर पोलीस अधिक्षक पदावर शहाजी उमाप हे कार्यरत होते. ज्या दिवशी कर्णीक गेले. त्यादिवसापासून नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा कार्यकाळ शहाजी उमाप यांना देण्यात आला त्यांनी तो कार्यकाळ 30 मे 2011 ते 20 जून 2012 पर्यंत सांभाळला. एक वर्षाच्यावर 20 दिवस ते नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक असतांना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पण राहिले. म्हणजेच तीन वर्ष ते नांदेड जिल्ह्याचे अपर पोलीस अधिक्षक होते आणि एक वर्ष 20 दिवस ते नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षकपण होते. त्या काळी राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचे आर.आर पाटील हे गृहमंत्री होते. आज राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचेच दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री आहेत. त्यामुळे शहाजी उमाप सारखेच आपल्याला पद मिळावे असे प्रयत्न नांदेड जिल्ह्यात सुरू आहेत.
शहाजी उमाप हे शहाजी उमापच होते. त्यांचा सारखा दुसरा घडणे अश्यकच आहे. आपल्या स्वप्नांना पुर्णरुप देतांना आम्ही त्याच्यासारखे करू या पेक्षा आम्ही जे आहोत तेच उत्तमरितीने करू असा विचार करण्याची गरज आहे. नाही तर त्याच्या सारखे होण्यामध्ये आपली वाट लागण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणूनच एक विचारवंत म्हणतो आज माणुसकी ही चिखलात आहे आणि माणुस जंगलात आहे. आम्ही सोने शोधतो पण खरी चमक पितळात आहे. या विचारवंताचे वाक्य खरे ठरले तर सोने मागे राहिल आणि पितळ खरे ठरण्याची वेळ येईल. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना 24 कॅरेटचे सोने हवे की, पितळाला 24 कॅरेट सोने दाखविण्यामध्ये त्यांना सहमती दर्शवायची आहे हा महत्वाचा विषय आहे. नाही तर आपल्या सत्याला लपवून बनावट प्रकारचे अजब किस्से सांगण्याची वेळ येणार आहे.
शहाजी उमाप नांदेडच्या विमानतळावर उभे राहुन आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करून घेवू शकत होते. गृहमंत्र्यांनी नांदेडच्या विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण केल्यानंतर मुंबईच्या गृहमंत्री कार्यालयात पोहचेपर्यंतचाच वेळ लागायचा आणि त्यांनी नांदेड विमानतळावर सांगितलेल्या बदली आदेशावर पहिली स्वाक्षरी व्हायची. सायंकाळी ती ऑर्डर बिनतारी संदेशाद्वारे नांदेडला पोहचायची अशी परिस्थिती होती. एवढीच ताकत आज आपल्यासाठी शहाजी उमापची जागा शोधणाऱ्यांमध्ये आहेे काय? त्या अपर पोलीस अधिक्षक असतांना कधीच ते पोलीस अधिक्षकांच्या कक्षात बसले नाहीत. त्यांनी पोलीस अधिक्षक झाल्यावर पोलीस अधिक्षकांचे वाहन सुध्दा कधी वापरले नाही. अशी विचारसरणी आज ज्यांना ती जागा हवी आहे त्यांच्यात आहे काय? शहाजी उमाप यांनी पोलीस खात्याच्या इभ्रतीवर डाग लावणाऱ्यांसाठी जंग-जंग पछाडले होते. नांदेडमधलेच आरोपी शोधतांना ज्यांच्या नाकी नऊ येतात त्यांच्या स्वप्नांमध्ये शहाजी उमापची जागा घेणे हे दिवा स्वप्न आहे. आपल्या मातहतांशी व्यवहार करतांना त्यांना चुकीची कामे सांगून ती न केली तर तिसऱ्याच्याच स्वाक्षरीने त्या अधिकाऱ्यांना कंट्रोलमध्ये जमा करण्याचे खलबतच ज्यांना येते त्यांनी आपली वेळ येईल तो पर्यंत वाट पाहिलेलीच बरी. नाहीतर गणपती करता करता आपल्या हाताने माकड तयार होईल या भितीला उल्लेखीत करण्यासाठीच आम्ही मेहनत घेतली आहे.
नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये पोलीस दलाच्या संख्येच्या मानाने आणि भुभागाच्या मानाने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा मानला जातो. एखाद्या घटनेला पाहण्यासाठी सिंदखेडला जायचे असेल आणि सिंदखेड येथे पोहचल्यावर मरखेलला जाण्याची वेळ आली तर हा संपुर्ण प्रवास 400 किलो मिटरपेक्षा जास्त होतो. अशा वेळी शहाजी उमाप चालत्या गाडीत जेवण करायचे सायंकाळ कोणाकडे घालवायची याची चिंता त्यांनी कधीच केली नाही. वेळप्रसंगी रस्त्यावरील फळ घेवून त्यांनी गाडीत बसूनच आपल्या पोटाची क्षुधा भागवली पण त्याने मला कांही आणून द्यावे असा विचारच कधी केला नाही. तेंव्हा नेहमीच आरसा पाहावा कारण एक विचारवंत म्हणतो, “आईना भी कमाल करता है, जानलेवा सवाल करता है। रोज पकडा हमे रंगे हातो रोज हंसकर बहाल करता है ।।’ आरसा असा आहे. आम्हाला दररोज शमा करतो आणि आम्ही दररोज चुकीचीच कामे करतो. शहाजी उमाप यांना भेटलेल्या जागेपेक्षा खुप मोठ्या जागेवर जाण्याचे स्वप्न जरुर बाळगा पण त्यासाठी लागणारी तयारी सुध्दा त्यांनाच करावी लागेल ज्यांना त्या जागांचे स्वप्न पडत आहे. हा सर्व प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये घडतो आहे आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबीकडे लक्ष देणार नाहीत असे होणार नाही, आमचा विश्र्वास आहे.शहाजी उमापचे व्यक्तीमत्व अशा स्वरुपाचे आहे की आज एका दशकानंतर सुध्दा त्यांची आठवण लोक स्वत: काढतात याबद्दल एक हिंदी विचारवंत म्हणतो, “हम तुम्हे इतना प्यारे करेंगे की, लोग हमे याद करेंगे’.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.